MLC Election 2022 : आठवडाभरात आमदारांची पुन्हा 'हॉटेलवारी'

in #yavatamal2 years ago

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. सर्व राजकीय पक्षांकडून आमदारांची मते फोडली जाऊ नयेत यासाठी विषेश खबरदारी घेतली जात आहे. पक्षाची मते फुटू नयेत यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांकडून त्यांच्या आमदारांना हॉटेल मध्ये ठेवण्यात येत आहे. (MLC Election 2022)महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १० जगांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे, दरम्यान राष्ट्रवादी पक्षाने सर्व आमदारांना शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ तारखेपासून हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार होतं मात्र खबरदारी म्हणून आजच शिवसेनेच्या सर्व आमदार पवई येथील वेस्टर्न हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासोबतच भाजपच्या आमदारांना निवडणूकीच्या दोन दिवस आधीच ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे. निवडणूकीला अगदी काही दिवस उरलेले असताना राजकीय पक्ष मते फुटणार नाहीत याची पुरेपुर काळजी घेताना दिसत आहेत.सर्व आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यासाठी पक्षांकडून बसेसची सोय करण्यात आलेली आहे. दोन दिवस हे आमदार हॉटेलमध्ये थांबणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या निवडणूकीत मतदानाची परवानगी हाय कोर्टाकडून नाकारण्यात आली आहे. ईडीने कैद्यांना मतदानाचा आधिकार नाही असा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे राज्यात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे.e35df167-c6aa-429c-95c3-ae04be263c12.jpg