राज्यसभेसाठी मविआची खेळी; बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांना भेटणार

in #yavatamal2 years ago

राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. दरम्यान आजच महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होणार आहेत.छगन भुजबळ,अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील फडणवीस यांची भेट घेणार आहेत. भाजपा किंवा शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक होणारच आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाजपा ठेवणार असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.या बैठकीत सहाव्या जागेचं भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीत आवश्यक तितकी मतं राष्ट्रवादी, शिवसेनेकडे आहेत. पण जर भाजपाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला तर मात्र ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते. दुसरीकडे राज्यसभेच्या ६ आणि विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक लढायचं ठरलं तर महाविकास आघाडीला विधान परिषदेची पाचवी जागा सोडावी लागेल. म्हणजे महाविकास आघाडीला सहा जागा आणि भाजपाला चार जागा, असं समीकरण होईल. पण जर राज्यसभा निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शिवसेनेला सहावी जागा सोडावी लागेल.esakal_new__61_.jpg