कोरोनात व्यवसाय गमावलेल्या गृहस्थाची आत्महत्त्या

in #yavatamal2 years ago

शहरातील सुप्रिम कॉलनीतील ४९ वर्षीय गृहस्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोना (Corona) काळातील लॉकडाउनमुळे (Lockdown) भरभराटीस आलेला कापड व्यवयाय बंद करावा लागल्याने या गृहस्थाने टोकाचे पाऊल उचलले. सुदाम नानाजी पाटील (वय ४९), असे मृताचे नाव नाव आहे.कुटुंबियांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीतील सुदाम पाटील दोन वर्षांपूर्वी यवतमाळ येथे स्थलांतरित झाले होते. कापड विक्री करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. कोरोनामुळे त्यांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जळगावात येऊन नवीन उद्योग सुरू करण्याच्या ते प्रयत्नात होते. त्यांनी घरही घेतले आणि केव्हाही आपला व्यवसाय नव्याने उभारण्याची ते तयारी करीत होते. सुदाम पाटील सध्या सुप्रिम कॉलनीत चुलतभाऊ संजय पाटील आणि देवीदास पाटील यांच्या घरी राहत होते. बुधवारी (ता. ३१) सुदाम पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेऊन त जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. हा प्रकार त्यांचे चुलत भावांच्या लक्षात आल्याने त्यांनी दार उघडत त्यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई, पत्नी प्रतिभा, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.3Dead_Body_20sucide.jpg