शिवसैनिक व्यथित अन् घात झाल्याची भावना

in #yavatamal2 years ago

: माहिम मतदारसंघातील शिवसेना भवन येथे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यास उभे होते. मात्र ते दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला पोहोचल्याची चर्चा आज दादरच्या शिवसेना भवनासमोर रंगली. बंडखोरांविरोधात संघर्षाच्या तयारीत असणारा शिवसैनिक जरी रस्त्यावर उतरला तरी घात झाल्याच्या भावनेने व्यथितही झाल्याने वातावरण गंभीर होते आणि ते दिसत मिळत होते. आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले आणि उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है... च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.शिवसैनिकांची जमलेली गर्दी पाहून काही सेकंदासाठी उद्धव ठाकरे हे देखील काही क्षण रेंगाळले. हात जोडून आणि दोन्ही हात उंचावून त्यांनी शिवसैनिकांना नमस्कार करत त्यांनी शिवसेना भवनात प्रवेश केला.त्यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे देखील शिवसेना भवनात पोहोचल्यावर दुपारी दोनच्या सुमारास बैठक सुरू झाली. मात्र त्यानंतरही शिवसेनाभवनासमोरची गर्दी वाढतच होती. शिवसेना कार्यकारिणीची बैठक सुरू होऊन ठराव मंजूर झाल्यानंतर अनिल देसाई घाईत बाहेर आले. या बैठकीत'' शिवसेना बाळासाहेब ठाकरे'' हे नाव कोणत्याही राजकीय पक्षाला वापरता येणार नाही असा ठराव करण्यात आला होता. त्या ठरावाची प्रत तातडीने निवडणूक आयोग आणि विधिमंडळ कार्यालयाकडे देण्याची जबाबदारी देण्यात आली होती.Untitled_2.jpg