मला शिकवणार का?’ मंत्रालयाच्या गेटवर अडवणाऱ्या पोलीस
![Sanjay-Bangar-Mantralaya.jpg](शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संजय बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रलायात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मला ओळखत नाही का? अशी विचारणा संजय बांगर यांनी केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.
२७ ऑक्टोबरला ही घटना घडल्याची माहिती आहे. संजय बांगर आपल्या १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. संजय बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.)