मी दहशवादी आहे का?” ५०० पोलिसांनी गराडा घातल्याचं सांगत सुषमा अंधारेंचा

in #digras2 years ago

Sushma-Andhare-6.jpgठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आज जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. पण पोलिसांनी सुषमा अंधारे यांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जळगावातील राजकीय वातावरण तापलं आहे. सभास्थळी जाण्यासाठी सुषमा अंधारे गाडीत बसल्या असता, जवळपास ५०० पोलिसांनी त्यांना अडवलं आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी स्वत: केला आहे. त्या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

यावेळी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सभास्थळी जाण्यासाठी मी गाडीत बसले आहे. मात्र, पोलिसांनी मला परवानगी नाकारली आहे. जवळपास पाचशे पोलिसांनी मला गराडा घातला आहे. माझ्याविरोधात दबावतंत्रांचा वापर वापर केला जात आहे. गुलाबराव पाटील माझ्यासोबत एवढं सूडाचं राजकारण का करत आहेत? हे अद्याप मला समजलं नाही.