हाच तो ऐतिहासिक क्षण! ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या राजाकडून पंतप्रधानपदी

in #dipak2 years ago

RISHI-SUNAK-1-2.jpgभारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांनी आज (२५ ऑक्टोबर) पंतप्रधनापदाचा पदभार स्वीकारला. प्रथेप्रमाणे ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी सुनक यांची अधिकृतरित्या ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत. शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती.