वेस्ट इंडिजच्या खेळाडूने मारलेला उत्तुंग षटकार मैदानाबाहेर, पाहा व्हिडीओ

in #sports2 years ago

मेलबर्न : T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अनेक छोट्या टीमनी मोठ्या टीमचा पराभव केला आहे. त्यामध्ये श्रीलंका (Shri Lanka) आणि वेस्ट इंडिज (west indies) या दोन टीमचा समावेश आहे. श्रीलंका टीमचा नामिबिया या टीमने पराभव केला आहे. तर वेस्ट इंडिज टीमचा स्कॉटलंड टीमने पराभव केला आहे. त्यामुळे यावर्षी विश्वचषक स्पर्धेत एक वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे.कालच्या झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्विकारली. स्कॉटलंडकडून पराभव झाल्यानंतर कालच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंनी सावध भूमिका घेतली.झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज टीमने 153 धावा केल्या. रोवमैन पॉवेल याने काल एक उत्तुंग षटकार लगावला. तो षटकार चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडला आहे. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या झिंबाब्वेच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

104 मीटर लांबीचा षटकार ज्यावेळी रोवमैन पॉवेल या खेचला, त्यावेळी समोर असलेला त्याचा सहकारी फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिला. तो चेंडू सरळ स्टेडियमच्या बाहेर गेल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले.Untitled-1.jpg