आठ फलंदाज मिळूनही 50 धावा करण्यात अपयशी, भारताच्या पराभवास रोहित शर्माच

in #yavatmal2 years ago

भारताने प्रथम गोलंदाज केली. त्यामुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 168 धावसंख्या उभारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल आणि रिषभ पंत (Rishabh Pant) ही जोडी सलामीला आली. पंत 9 धावा करत बाद झाला. या बरोबरच तो सलग दुसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने पहिल्या सामन्यातही 9 धावा केल्या होत्या. भारताचे तब्बल आठ फलंदाज 50 धावसंख्याही करू शकले नाही. राहुल, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक वगळता कोणताही भारतीय फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

राहुलने अर्धशतके केले, मात्र त्यासाठी त्याने 43 चेंडूंचा सामना केला. यामुळे त्याची संथ खेळीही भारताच्या पराभवाचे कारण ठरली आहे. त्याने 55 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 74 धावा केल्या. पंतनंतर दीपक हुडा पण 6 धावा करत बाद झाला. हार्दिक खेळपट्टीवर टिकला होता. त्याने आपल्या खेळीची चांगली सुरूवातही केली होती, मात्र तो 17 धावांवरच बाद झाला. अक्षर पटेल आणि फिनिशर दिनेश कार्तिक हे दोघेपण लवकरच तंबूत परतले. खालच्या फळीतील खेळाडूंंकडून अपेक्षाही नव्हती. अशा तऱ्हेने भारताच्या 8 फलंदाजांनी मिळून धावफलकावर केवळ 48 धावाच जोडल्या.भारताने कर्णधार बदलला हा निर्णयही चुकीचा ठरला. त्यातच रोहित संघात असूनसुद्धा सलामीला तो आला नाही इथेही भारत चुकला. तसेच तो फलंदाजीला आलाच नाही. सूर्यकुमार यादव याने मागील सामन्यात अर्धशतक केले होते. त्यामुळे भारताने तो सामना जिंकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात तो आणि विराट कोहली खेळले नाहीत. यामुळे त्या दोघांशिवाय भारत लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरला. या सामन्यात भारताने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 132 धावा केल्या.

भारत आता ऑस्ट्रेलिया (17 ऑक्टोबर) आणि न्यूझीलंड (19 ऑक्टोबर) विरुद्ध सराव सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिसबेन येथे खेळले जाणार आहेत.Rohit-Sharma-1.jpg