उर्वशीनं शेअर केला सिंदूर भरलेला फोटो,युझर्स म्हणाले-

in #yavatmal2 years ago

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्व कप २०२२ स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात आहे. ऋषभ पंत याचा देखील भारतीय क्रिकेट संघामध्ये समावेश झाला आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला याचसाठी ऑस्ट्रेलियात गेली. गेल्या काही दिवसांपासून उर्वशी तिथून सातत्यानं काही फोटो, व्हिडिओ शेअर करत आहे. मंगळवारीदेखील उर्वशीनं एक फोटो शेअर केला.उर्वशीनं जो फोटो शेअर केला, तो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण उर्वशीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं भांगामध्ये सिंदूर लावलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत उर्वशीनं लिहिलं की, 'प्रेमात पडलेल्या प्रेयसीसाठी सिंदूर खूप प्रिय असतो. हे सारं विधीवत हव आहे. प्रिया... तुझ्याकडून आयुष्यभरासाठी साथ हवी आहे.' यानंतर तिनं हार्ट इमोजीही शेअर केला.उर्वशीनं शेअर केलेली ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेन्ट करायला सुरुवात केली. एक युजरनं लिहिलं की, 'बाई गं, आता तरी ऋषभ पंतला सोड. टी२० वर्ल्ड कप झाल्यानंतर तुमच्या दोघाचं लग्न लावून देऊ.' तर अन्य एकानं लिहिलं की, 'ऋषभ दादापर्यंत लग्नाची गोष्ट पोहोचली असेल. अभिनंदन उर्वसी आणि ऋषभ दादा'इन्स्टाग्रामवरही उर्वशीनं हा फोटो शेअर केल्यानंतर तिथंही युझर्सनी कमेन्ट केल्या. एकानं लिहिलं की, 'विश्वकपसाठी सध्या तरी पंतला सोडून दे प्लीज. त्याचं लक्ष विचलीत करू नकोस. विश्वकप झाल्यानंतर तुमचं लग्न लावून देऊ.' तर आणखी एकानं लिहिलं की, 'उर्वशी तुला झालंय तरी काय?' तर अन्य एकानं लिहिलं आहे की, 'ऋषभ पंतवर दया दाखव...'urvashi-rautela-94780962.jpg