यिनचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
यिनचा आठवा वर्धापन दिन सकाळ कार्यालयात तरुणाईच्या जल्लोषात शुक्रवारी साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्तम 'सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर झाले. यावेळी यिनच्या स्थापनेपासून असणारे आजी व माजी यिनच्या सदस्यांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यिनच्या व्यासपीठाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्ष महाराष्ट्रातील हजारो महाविद्यालयीन तरुणांना नेतृत्व विकास व सामाजिक चळवळ याचे मार्गदर्शन लाभत आहे. यिनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ व सिनेअभिनेते अजय पूरकर हे आवर्जुन उपस्थित होते आणि त्यांनी तरुणाईला प्रोत्साहन दिले.