Ravindra Jadeja : जडेजाच्या गुडघ्यावर होणार शस्त्रक्रिया, टी 20 वर्ल्डकपला मुकणार?

in #yavatmal2 years ago

Ravindra Jadeja T20 World Cup : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला होता. आता त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर (Knee Injury) शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपला देखील मुकण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले. दरम्यान, बीसीसीआयने याबाबत आजून कोणताही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा: IND vs PAK : रविवारी देखील असंच खेळू शकतो का? पाकच्या माजी गोलंदाजाचा घरचा आहेर

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रविंद्र जडेजा आगामी टी 20 वर्ल्डपला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला क्रिकेटपासून खूप काळ दूर रहावे लागणार आहे.' ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. रविंद्र जडेजाच्या उजव्या घुडघ्याला दुखापत झाली आहे. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथाच्या देखरेखीखाली रविंद्र जडेजा आपल्या दुखऱ्या गुडघ्यावर उपचार घेत आहे.
हेही वाचा: IND vs PAK : भारताच्या सामन्यापूर्वीच पाकला दुखापतींची दृष्ट; अजून एक वेगवान गोलंदाज आऊट

दरम्यान, युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये रविंद्र जडेजा भारताच्या पहिल्या दोन सामन्यात खेळला होता. त्याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 35 धावांची सामना जिंकून देणारी खेळी देखील केली होती. मात्र हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यानंतर रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आले. त्यावेळी तो संपूर्ण आशिया कपसाठी मुकणार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संघात संधी देण्यात आली आहे.esakal_new___2022_09_03T205706_982.jpg