Koffee With Karan: ऐकावं ते नवल! करण जोहर - डेव्हिड धवनचं होतं?

in #yavatmal2 years ago

Koffee With Karan Finale: करणच्या बाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आपल्या वेगवेगळ्या कारणामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आताही तो त्याच्या कॉफी विथ करणमुळे लाईमलाईटमध्ये आला आहे. करण हा बोल्डनेससाठी ओळखला जातो. त्यानं आपली ओळख, वैयक्तिक आयुष्य, प्रेमप्रकरणं ही काही कुणापासून लपवून ठेवली नाहीत. त्यानं त्याच्या शोमध्ये केलेल्या एका विधानानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. वास्तविक यापूर्वी बॉलीवूडच्या पुरस्कार सोहळ्यातमध्ये करणला त्या प्रश्नांवरुन छेडण्यात आले होते.कॉफी विथ करणच्या शो चा अखेरचा एपिसोड आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या फिनाले मध्ये एआयबी फेम तन्मय भट्ट आणि सोशल मीडिया कुषा कपिला सहभागी होणार आहे. त्याच्या प्रोमोचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. करण त्याच्याच शोमध्ये शांत झाल्याचे पहिल्यांदाच दिसते आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.newsroom_webbanner__20_.jpg