हेल्थ वेल्थ : उच्च रक्तदाब : कारणे आणि उपाय

in #yavatmal2 years ago

विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲपरक्त हा प्रवास करणारा, वाहक आणि प्रदाता आहे. ते रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाते. ते विविध कार्ये करण्यासाठी आणि जीवन टिकवण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये वाहून नेते. इतकेच नाही, तर हे पांढऱ्या रक्तपेशी आणि इतर पेशींना ऊर्जा आणि शरीराच्या विविध अवयवांमध्ये आणि भागांपर्यंत पोहोचण्यासाठी एक माध्यम प्रदान करते. आपल्या शरीरात रक्त फिरत राहण्यासाठी, हृदयाला सतत पंपिंग करणे आवश्यक आहे आणि रक्तवाहिन्यांना प्रवास चालू ठेवण्यासाठी रस्ता प्रदान करणे गरजेचे आहे. प्रत्येक हृदयाच्या ठोक्यांद्वारे, रक्त एका विशिष्ट दाबाने प्रवास करते. हा दाब रक्तवाहिन्यांना जाणवतो. एखाद्याला उच्च रक्तदाब असल्याचे निदान होते, तेव्हा हे सूचित करते, की रक्तप्रवाह रक्तवाहिन्यांच्या आतील भागावर उच्च दाब देत आहे.हा दाब दोन भागामध्ये नोंदविला जाऊ शकतो : जेव्हा हृदय रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पंप करते, ज्याला सिस्टोलिक दाब म्हणतात. जेव्हा हृदय धडधडण्याच्या दरम्यान आराम करते, आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पाठवत नाही, ज्याला डायस्टोलिक दाब म्हणतात. उच्च रक्तदाबादरम्यान नक्की काय होते?रक्त वाहिन्यांमधून जास्त दाबाने जात असल्यास याचा अर्थ हृदय रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करत आहे. रक्तवाहिन्यांमधील दाब वाढल्यामुळे, त्यांच्या आतील बाजूवर जोरात ढकलले जाते, ज्यामुळे त्यांना नुकसान पोचते. रक्तवाहिन्या जाड आणि खडबडीत वाढू लागतात, जे आतील बाजूवर चरबीयुक्त पदार्थ जमा व्हायला प्रोत्साहन देते. यातून रक्तप्रवाह कमी होतो आणि वाढतो. हे एक जीवघेणे चक्र असू शकते.अरुंद धमण्या, अधिक कष्ट करणारे हृदय आणि खराब रक्तप्रवाह यामुळे हृदयविकार, किडनीचे आजार, पक्षाघाताचा धोका संभवतो. उच्च रक्तदाब हळूहळू विकसित होतो आणि बहुतेक वेळा लपलेला राहतो. उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरणारी अनेक कारणे आहेत, जसे की बैठी जीवनशैली, वय, जास्त वजन किंवा लठ्ठपणा, जास्त प्रमाणात मीठ सेवन करणे, अल्कोहोल, दीर्घकाळ झोप न लागणे. उच्च रक्तदाब ही आयुष्यभराची समस्या राहते, परंतु त्यावर उपाय करून त्यावर नियंत्रण मिळवता येते. निरोगी जीवनशैली : यात पोषक आहार आणि नियमित व्यायाम यांचा समावेश आहे.Blood_Pressure.jpg