आज ती नसली तरी...'; नवरात्रीला सोनालीच्या भावूक पोस्टनं वेधलं लक्ष

in #yavatmal2 years ago

Sonalee Kulkarni: आज घटस्ठापना..नवरात्रोत्सवाला सुरुवात...आनंदाचा,उत्साहाचा,उत्सवाचा पहिला दिवस. घरोघरी घटाची पूजा केली जाते. माळा लावल्या जातात. देवीची आराधना केली जाते. जागर केला जातो. वातावरण कसं प्रफुल्लित असतं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच या उत्सवात रंगून गेलेले दिसतात. आज सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले उत्सवाचे काही अनुभवही शेअर केलेत. यादरम्यान अप्सरा सोनाली कुलकर्णीनं देखील नवरात्रीच्या शुभेच्छा देत एक भावूक आठवण शेअर केली आहे. (Sonalee Kulkarni emotional post for her grandmother,share navratrotsav memories)सोनालीनं आपल्या दिवंगत आजीचं स्मरण करत नवरात्रीची केलेली पोस्ट मनाला स्पर्शून जाते. तिनं पोस्ट करताना आपल्या लग्नसोहळ्यातला आजीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आजीच्या गालाला गाल लावत लाड करुन घेणारी सोनाली आजीच्या किती जवळ होती हे या फोटोवरनं दिसत आहे. सोनालीनं नवरात्रीच्या शुभेच्छा देत आजी आपल्या घरी कशी घटस्थापना करायची आणि आपल्या आयुष्यात ती कायम आपली पहीली दुर्गा असेल असं तिनं म्हटलेलं आहे.Untitled_design___2022_09_27T010603_040.jpg