सिनेट’साठी केलेले तुमचे मतदान होऊ शकते बाद? गुरुवारी मतदान, जाणून घ्या प्रक्रिया

in #yavatmal2 years ago

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’साठी गुरुवारी (ता. २९) सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. संस्थाचालक, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसह अभ्यास मंडळ आणि विद्यापरिषदेच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील ११० महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. आता प्रचारासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवार सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत.विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या एकूण ३८ जागांसाठी ७५ उमेदवार आहेत. ‘पदवीधर’साठी आठ हजार ६४७, ‘शिक्षक’साठी ९५७ आणि संस्था प्रतिनिधींसाठी ५५ मतदार आहेत. दरम्यान, विद्यापरिषदेच्या आठ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या असून, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या खुल्या जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. अभ्यास मंडळात रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि इंग्रजीच्या प्रत्येकी तीन जागांसाठी १२ उमेदवार आहेत. तसेच शैक्षणिक मूल्यमापनाच्या तीन जागांसाठी चार उमेदवार आहेत. निवडणूक नियोजनासाठी विद्यापीठाने ८८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती कुलसचिव डॉ. योगिनी घारे यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत शिक्षक, पदवीधरमधील प्रत्येकी एक तर विद्यापरिषदेच्या चार, ४३ पैकी ४० अभ्यास मंडळाच्या जागांवर ‘सुटा’चे वर्चस्व राहिले आहे. मागील पाच वर्षांतील विद्यार्थीकेंद्रित कामांच्या बळावर निश्चितपणे ‘सुटा’च निर्विवाद वर्चस्व मिळवेल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.0election_39.png