“उद्या मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता, मात्र…”; अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

in #newupdet2 years ago

उद्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असे ते म्हणाले.Ajit-pawar-new.jpg