Rutuja Latke: अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेकडून मंजूर

in #tiwari2 years ago

अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचं पत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोट निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. (Rutuja Latke BMC Office Resignation Confirm )ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच दिला होता. विशेष म्हणजे त्या तेव्हापासून नोकरीवरही हजर नाहीत. तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. दरम्यान, 12 ऑक्टोबर 2020 रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते.

Rutuja Latke: अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेकडून मंजूर
Published on : 14 October 2022, 4:09 am

By
टीम ईसकाळ टीम

अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा पालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचं पत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोट निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. (Rutuja Latke BMC Office Resignation Confirm )

ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच दिला होता. विशेष म्हणजे त्या तेव्हापासून नोकरीवरही हजर नाहीत. तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. दरम्यान, 12 ऑक्टोबर 2020 रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीच्यावेळी लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारवा आणि तसे पत्र द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आज सकाळीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मंजूर केला.कोर्टाच्या निर्णयानंतर, मला न्यायदेवतकडून न्याय मिळाला आहे. आपण पतीचा वारसा पुढे नेणार आहोत. राजीनामा मंजूर झाल्याची प्रत मिळाल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ऋतुजा लटके यांनी यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.rutuja_latke.jpg