आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण तुम्ह

in #digras2 years ago

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटांच्या निवडीमुळे आणि विषयांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. आमिर खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता आमिर खानने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आमिर खानची ही मुलाखत घेतली. यावेळी आमिर खानने लाल सिंग चड्ढा या चित्रपटाशिवाय विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी आमिरने नागराज मंजुळेंचे तोंडभरुन कौतुक केले.

या मुलाखतीदरम्यान आमिर खानने नागराज मंजुळेंबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच त्याने मी तुमचा खूप मोठा चाहता आहे असेही नागराज मंजुळेंना सांगितले. यावेळी आमिर खान म्हणाला, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला याची कल्पनाही नाही. तुम्ही इतक्या वेळेपासून बोलत आहात, पण आता मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे.aamir-khan-nagraj-manjule.jpg