SBI चा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका; बँकेने केला हा बदल, आजपासून जास्त येणार खर्च
जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. SBI ने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) 70 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या बदलानंतर SBI कडून कर्ज घेणाऱ्यांचे EME वाढेल. यापूर्वी आरबीआयने रेपो दरात 1.40 टक्के वाढ केली आहे. हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे.