Vedanta-Foxconn Project : ..तर हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला नसता; 'मविआ'वर टीका सामंतांनी सांगितलं कारण

in #yavatmal2 years ago

Uday Samant News : वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळं आणि चांगलं घडतंय, ते तुमच्यामुळं असं होत नसतं, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 'मविआ'वर केली. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.मविआ'वर टीका करत सामंत म्हणाले, वाईट झालं तर आमच्यामुळं झालं. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथं आणण्यासाठी 8 ते 9 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक Incentive Schemes शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजींशी फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण, मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचं ठरवलं.