कोथरूडमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'? बृजभूषण सिंह लावणार हजेरी

in #yavatmal2 years ago

Maharashtra Kesari 2022 : कुस्तीचा कुंभ मेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. ९०० कुस्तीगीर स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार डिसेंबर मध्ये रंगणार आहे. महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यातील ११ महापालिकांमध्ये ४५ तालीम संघातील ९०० मल्ल स्पर्धेत सहभाग घेणार आहे. नामांकित ४० मल्ल सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यातील ६ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. डिसेंबर महिन्यात नक्की कोणत्या तारखेला ही स्पर्धा होणार आहे हे अद्याप नक्की झालेली नाही.