HCI Tech कडून गुंतवणुकदारांना दिवाळी भेट, प्रति शेअर 10 रुपयांचा अंतरिम डिव्हिडेंड
एचसीएल टेकने (HCL Technologies) त्यांच्या गुंतवणुकदारांना दिवाळी भेट दिली आहे. कंपनीने बुधवारी तिसरा अंतरिम डिव्हिडेंड (Interim Dividend) जाहीर केला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी हा डिव्हिडेंड आहे. याअंतर्गत गुंतवणुकदारांना प्रति शेअर 10 रुपये अंतरिम डिव्हिडेंड मिळेल.कंपनीने अंतरिम डिव्हिडेंडसाठी 20 ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज 2 नोव्हेंबरपर्यंत हा डिव्हिडेंड गुंतवणुकदारांना देईल. प्रत्येक 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी 10 रुपये अंतरिम डिव्हिडेंड देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले आहे.