Shivsena Battle: "भाजप नेत्यांनी अद्याप फडणवीस-शिंदेंना पेढे का भरवले नाहीत"

in #in2 years ago

मुंबई - शिवसेना पक्ष कोणाचा याचा पेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणूक आयोगाने या संदर्भात शनिवारी निकाल देत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे. यावर आतापर्यंत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाचा शिवसेनेच्या अस्तासाठी देवेंद्र फडणवीसांवरच रोष दिसून येत आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)
Sunday, October 9, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Shivsena Battle: "भाजप नेत्यांनी अद्याप फडणवीस-शिंदेंना पेढे का भरवले नाहीत"
Published on : 9 October 2022, 10:43 am

By
सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्ष कोणाचा याचा पेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणूक आयोगाने या संदर्भात शनिवारी निकाल देत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे. यावर आतापर्यंत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाचा शिवसेनेच्या अस्तासाठी देवेंद्र फडणवीसांवरच रोष दिसून येत आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)

हेही वाचा: Shivsena: उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; 'शिवसेना' नावासह धनुष्यबाण चिन्ह गोठवले

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, या देशातील अनेक राज्यांमधील सरकारे बदलली. कितीही राजकीय विरोधक असला तरी तो मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर आतापर्यंत कधीही कोणी पेढे भरवले नाही. आमची भाजपसोबत २५ वर्षे मैत्री होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना पेडे भरवत होते. मात्र आता शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे अजुन कसे फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना पेढे भरवत नाहीत, याचं मला आश्चर्य वाटत असल्याचं जाधव यांनी म्हटलं.

Sort:  

hi