उर्फीने सोडला ताल, ट्रान्सपरंट प्लास्टिकवर लावून आली दोन फुलं..

in #in2 years ago

Urfi Javed : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. आता तर ती चक्क ट्रान्सपरंट प्लास्टीक गुंडाळून त्यावर फक्त काही फुलं चिकटवून आली आहे. नुकताच तिने हा विडिओ शेअर केला असून तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घतला आहे. (uorfi javed news sakal) (urfi javed wear transparent plastic top with flowers)उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती सतत काहीतरी वेगळा लुक घेऊन चाहत्यांसमोर येत असते. आता तर उर्फीने कहरच केला आहे. उरफीने केवळ अंगाभोवती ट्रान्सपरंट प्लास्टीक गुंडाळले आहे आणि शरीराचा काही भाग झाकण्यासाठी केवळ काही फुलं चिकटवली आहे. हे रूप पाहुन उर्फी आता ताल सोडून वागू लागली आहे का अशी अवस्था नेटकऱ्यांची झाली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियायवर व्हायरल झाला असून चाहते बऱ्या वाईट कमेंट देत आहेत.