खोलीत आल्यावर लायटर किंवा आग लावू नका"; आईसह 2 लेकींची आत्महत्या, सुसाईड नोटने खळबळ

in #yavtmal2 years ago

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पॉश परिसरात असलेल्या वसंत विहारमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. आई आणि दोन मुलींनी फ्लॅटला चारही बाजूंनी कुलूप लावले होते आणि त्यात काही रासायनिक पदार्थ टाकले. प्राथमिक तपासात तिघीचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी कुटुंबप्रमुखाचा कोरोनाने मृत्यू झाला होता, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब नैराश्यात होते.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मंजू आणि तिच्या दोन मुली अंशिका (30) आणि अंकू (30) अशी मृतांची नावे आहेत. कोरोना काळात महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यावर घराची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत विहार पोलीस स्टेशनला रात्री 9 वाजताच्या सुमारास पीसीआर मार्फत माहिती मिळाली की वसंत अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅट क्रमांक 207 मध्ये काही लोकांनी स्वतःला कोंडून घेतले आहे.

माहिती मिळताच घटनास्थळी टीमसोबत पोहोचलेल्या एसएचओला सर्व खिडक्या आणि दरवाजे आतून चारही बाजूंनी बंद दिसले. खोलीत अर्धा उघडलेला एलपीजी सिलेंडर आणि काही सुसाईड नोट पडलेल्या आढळून आल्या. आतील खोल्यांची झडती घेतल्यावर बेडवर तीन मृतदेह आढळून आले. तिघींचाही गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी, घराचा मालक आणि मंजूच्या पतीचा एप्रिल 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतरच संपूर्ण कुटुंब नैराश्याचे बळी ठरले.

मंजू सतत आजारी पडू लागली. अंशिका आणि अंकू या दोन्ही मुलीही कुणाच्या संपर्कात नव्हत्या. अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त मनोज सी म्हणाले की, रात्री 8:55 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला की एका घरातील रहिवासी दरवाजा उघडत नाहीत आणि ते आतून बंद आहे. खोलीचा दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडल्यावर "खोलीत आल्यानंतर कोणीही लायटर किंवा आग लावू नका" असं भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.