सेना नेत्यांनी कुणाचे पैसे कुठं गुंतवलेत हे माझ्याइतकं कुणालाच माहित नाही'

in #wortheum2 years ago

तुम्ही किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून धुतल्या तांदळासारखा असल्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या घरावर ईडीने जप्ती आणली असून अजूनही बरंच काही आहे. तुमच्यातील ठराविक लोकांचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे आहेत. शिवसैनिकांना त्यातली कवडी तरी दिली का?, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी प्राण गमावले, त्यांचे संसार उघडे पडलेत मुख्यमंत्री गेले का त्यांच्या घरी? शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाचे पैसे, कुठे गुंतवलेत हे माझ्याइतके कुणालाच माहित नाही. अगदी किरीट सोमय्यांनाही नाही, असं सचूक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. आज मुंबईत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, भाजपची देशात सत्ता आहे. ३०२ खासदार असून अनेक राज्यातही सत्ता आहे. त्यामुळ सत्ताधाऱ्यांची समोर येऊन नजर भिडवायची ताकद नाही. ज्या अर्थी आमदार नाही, खासदार नाही त्या अर्थी एकाकी पडणार आहात हे लक्षात घ्या, असा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. संजय राऊत काल परवा शिवेसेनेत आले आहेत. त्यांना काय कळत यातंल. आधी ते कपडे उतरवायची भाषा करत होते आता आदेश द्यायला लागलेत. पक्ष प्रमुख कोण आहेत, उद्धव ठाकरे की संजय राऊत असा सवालही राणे यांनी केला आहे.