नवजात मुलीची सात लाखांत विक्री

in #wortheum3 years ago

नागपूर : डॉक्टर आणि दोन मध्यस्तांच्या मदतीने सरोगसी मदरच्या नावावर हैदराबाद येथील दाम्पत्याला नवजात मुलीला विकणाऱ्या डॉ. विलास भोयर आणि एका मध्यस्तांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी सात लाखात चिमुकलीची विक्री केली. गुन्हे शाखेच्या पथकाने या रॅकेटचा पर्दाफाश केला असून नवजात मुलीला हैदराबाद येथून सुखरूप परत आणले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

डॉ. विलास दामोदर भोयर (वय ३८ रा.गुमथळा, कामठी), राहुल ऊर्फ मोरेश्‍वर दाजीबा निमजे (वय ३२ रा. श्रीकृष्णनगर, वाठोडा) आणि नरेश उर्फ ज्ञानेश्‍वर राऊत (वय ४८ रा. मुदलीयारनगर, शांतीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ‘क्युअर इट’ या खासगी रुग्णालयात भोयर डॉक्टर कार्यरत असून त्याचे कामठीला स्वतःचे क्लिनीक आहे. २ फेब्रुवारीला त्याने हे नवजात बाळ मोरेश्‍वर नावाच्या व्यक्तीच्या मदतीने हैदराबाद येथील दाम्पत्याला विकले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात प्रेमसंबधातून गर्भवती झालेल्या एका मुलीने गर्भपात करण्यासाठी डॉ. विलास दामोदर भोयर यांचेशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी या युवतीला गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. दरम्यान हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेल्या प्राध्यापक दाम्पत्याला बाळ हवे होते. त्याची माहिती राहुल ऊर्फ मोरेश्‍वर दाजीबा निमजे (वय ३२ रा. श्रीकृष्णनगर, वाठोडा) याच्या माध्यमातून कळली. त्यामुळे तिघांनीही दाम्पत्याला ‘सरोगेट मदर’च्या माध्यमातून ते मिळणार असल्याची बतावणी केली होती. त्यासाठी त्यांनी दांपत्याचा उपचार सुरू केला. त्याचे रक्त आणि सिरम तपासणीसाठी नमुने घेतले होते. तसेच बनावट कागदपत्रेही तयार केली.दरम्यान नरेश याच्या माध्यमातून उमरेड मार्गावरील क्युअर इट या रुग्णालयात दाखल केले. २ फेब्रुवारीला नवजात मुलगी या दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आली. अशाप्रकारे नवजात स्त्रीलिंगी बाळ विकल्यानवजात मुलीची सात लाखांत विक्रीगेल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे आली. त्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांना दिले. त्यांनी डॉ.विलास भोयर यांना ताब्यात घेतले. त्याच्या माध्यमातून दोघांना अटक केली. याशिवाय ज्यांना नवजात मुलगी विकली, त्यांच्याकडून ते सुखरूप परत आणले.आणखी काही रडारवरप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असली, तरी यामध्ये आणखी बरेचजण असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांच्या रडारवर आणखी काही जण रडारवर असल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने अनेक खुलासे होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.3baby_201.jpg