भिवंडीतील संरक्षक भिंत दुर्घटना प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल

in #yavatmal2 years ago

शहरातील चव्हाण कॉलनी येथील ख्वाजा गरीब नवाज मॅरेज हॉलची संरक्षक भिंत पाडकाम करीत असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाल्याच्या घटने नंतर परिसरातील नागरीक निजामुद्दीन मोहरअली अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलीस ठाण्यात अनोळखी जेसीबी चालकावर दुर्घटनेस जबाबदार धरत मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र ही संरक्षक भिंत पालिका प्रशासनाच्या मालकीची असतांना पालिकेने त्यासंदर्भात कोणतीही तक्रार केली नसून ही भिंत पाडण्याचे काम कोणाच्या आदेशाने सुरू होते या बाबत सुध्दा प्रशासनास काहीएक माहित नसल्याचा खुलासा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महापालिकेने स्थानिक नागरीकांची गरज ओळखून चव्हाण कॉलनी येथे दहा वर्षांपूर्वी हे मॅरेज हॉल मोकळ्या मैदानात एक व्यासपीठ व संरक्षक भिंत बांधली होती.हि संरक्षक भिंत धोकादायक झाल्याने त्या ठिकाणी नव्याने संरक्षक भिंत उभारण्यासाठी स्थानिक आमदार रईस शेख यांच्या स्थानिक विकास निधीतून नव्याने संरक्षक भिंत उभारणीसाठी निधी मंजूर केला गेला आहे.मात्र या बाबत नव्याने संरक्षक भिंत उभारणीच्या कामाबाबत कोणतेही कार्यदेश दिले नसताना हे बांधकाम नक्की कोण पाडत होते हे अजून ही पालिका प्रशासनास माहीत नाही किंवा पालिका प्रशासन त्याबाबत जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचा आरोप देखील होत आहे.

येथील मॅरेज हॉल व संरक्षक भिंत उभारणीसाठी निविदा प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत असून अजून निविदा पूर्ण झाली नाही.त्यामुळे पालिका प्रशासना कडून ही भिंत पाडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे स्पष्ट करीत या बाबत पालिका स्तरावर चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई महानगरपालिका वतीने केली जाईल अशी प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली आहे .

आणखी police-abd-maharashtra-1a_202208869805.png