विघुत तारांच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान

in #yavatmal2 years ago

समुद्रपूर तालुक्यातील गिरड परीसरातील रासा येथे शेतात जमिनीवर पडून असलेल्या जिवंत विघुत ताराच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू झाला असून यामध्ये शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास रासा येथिल शेतकरी गजानन चिडे यांचा मुलगा मयुर चिडे हा आपली बैलजोडी घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी नेत असतांना आनंदराव चचाने यांच्या शेतात पडून असलेल्या जिवंत विघुत ताराचा एका बैलाला स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी गजानन चिडे यांनी यासंबंधी गिरड पोलीस ठाण्यात व गिरड येथील व गिरड येथिल विघुत विभाग कार्यालयाला माहिती दिली माहिती मिळताच सहाय्य अभियंता सुबोध गणवीर,आडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिस कर्मचारी अमित शेख,अनुप टपाले यांनी पंचनामा ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याचा ६० हजार रुपये किंमतीचा बैलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावले आहे.तरी संबंधित विघुत विभागाने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश महातळे, शेतकरी गजानन चिडे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.

catslgbilaw_202208876031.jpg