सोन्याच्या किंमतीत वाढ; मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांनी घसरण, आजचा नेमका दर, जाणून घ्या...!
लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,३३० रूपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत ३८० रुपयांनी वाढ झाली. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४७,०५० रुपये इतके आहे.