पंकज त्रिपाठींची पत्नी मृदुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, या चित्रपटातून होतोय डेब्यू

in #yavtmal2 years ago

आज बॉलिवूडची ‘जान’ आहेत. बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंकज यांनी बराच संघर्ष केला. 2004 मध्ये ‘रन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. पण त्यांची ही भूमिका इतकी छोटी होती की, त्याच्याकडे कुणाचंच फारस लक्ष गेलं नाही. मात्र पंकज यांनी हार न पत्करता, मिळेल त्या भूमिका स्वीकारत आपला प्रवास सुरु ठेवला. अखेर 2012 मध्ये ‘गँग ऑफ वासेपूर’ मिळाला आणि पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख मिळाली.अल्पावधीतच त्यांनी अभिनयानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता काय तर पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला त्रिपाठी (Pankaj Tripathi Wife Mridula ) ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. होय, मृदुला नवरोबाच्या ‘शेरदिल- द पीलीभीत सागा’ (Sherdil ) या आमामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. या चित्रपटात मृदुला एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पंकज त्रिपाठी यांनी स्वत: पत्नीच्या डेब्यूची माहिती दिली आहे.

डायरेक्टरने म्हणून दिला रोल...‘शेरदिल- द पीलीभीत सागा’ चे दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांचं मृदुलासोबत बंगाली कनेक्शन आहे. त्यामुळे श्रीजीत यांनी मृदुलाला त्यांच्या चित्रपटात भूमिका देण्याचं वचन दिलं होतं. चित्रपटाची ही ऑफर ऐकून मृदुलाने लगेच होकार दिला. कारण यात तिला सुंदर बंगाली साडी नेसण्याची संधी मिळणार होती. तिच्यासाठी ही सोपी ऑफर होती, असं पंकज त्रिपाठींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या चित्रपटासाठी मृदुलाने फी घेतली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पंकज त्रिपाठींचा हा सिनेमा येत्या 24 जूनला प्रदर्शित होतोय. यात नीरज काबी व सयानी गुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

पंकज त्रिपाठी यांनी 2004 मध्ये मृदुलासोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनीही बराच संघर्ष केला. अगदी लग्नानंतर पंकज यांच्यासोबत बॉईज होस्टेलमध्ये मृदुलाला राहावं लागलं. संघर्षाच्या काळात मृदुला पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.