Nandurbar : महाराष्ट्र - गुजरातला जोडणारा रंका नदीवरील धानोरा पूल कोसळला

in #digras2 years ago

Canva__20_.jpgनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा रंका नदीवरील धानोरा पूल आज सकाळी कोसळल्याने महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, यावेळी कोणतेही वाहन या पुलावर नसल्यामुळे यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तर हा पूल ४५ वर्षे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. (maharashtra gujrat connectivity bridge collapse )