मायलेकाच्या शरीरावरुन भरधाव ट्रकची चाकं धडधडत गेली आणि….
नागपूर औरंगाबाद महमार्गावर गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. 3 दिवसांत तब्बल चार जणांचा या महामार्गवर झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. आज घडलेला हा अपघात अत्यंत भीषण होता.
वाशिम : दुचाकीवरुन जाणाऱ्या मायलेकाच्या शरीरावरुन भरधाव ट्रकची चाकं धडधडत गेली. या भीषण अपघातात (Washim Accident News) मायलेकाचा जागच्या जागीच जीव गेला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना वाशिम (Washim) जिल्ह्यात घडली. मायलेक दुचाकीवरुन एकत्र बाईकवरुन जात होते. बाजारात जाण्यासाठी ते दोघं निघाले होते. त्यावेळी एक भरधाव ट्रक काळ बनून आला. दुचाकीनं जबर धडक दिली. यात मायलेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर मायलेकाचे मृतदेह (Mother Son killed in road Mishap) रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या अपघातानं प्रत्यक्षदर्शीही हादरुन गेले होते.