Adipurush: ओम राऊतने ‘तान्हाजी’नंतर जे मिळवलं ते ‘आदिपुरुष’मुळे गमावणार?

in #nagpur2 years ago


रामायणासारखा विषय हाताळताना केली घाई? नेटकऱ्यांचा सल्ला ओम राऊत ऐकणार का?
ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji) हा चित्रपट म्हणजे उत्तम कामगिरीचा एक नमुना मानला जातो. ऐतिहासिक कथा हाताळताना त्यातल्या कोणत्याही भूमिकेला धक्का न पोहोचवता अचूक मांडणी या चित्रपटातून करण्यात आली. तान्हाजी मालुसरे यांची कामगिरी पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. या चित्रपटानंतर ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ची (Adipurush) चर्चा सुरू झाली. रामायण या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या साहजिकच खूप अपेक्षा होत्या. मात्र जेव्हा त्याचा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा अनेकांची निराशा झाली.

‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावण, क्रिती सॉनन ही सीता आणि देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत आहे. जवळपास पावणे दोन मिनिटांच्या या टीझरमधल्या अनेक गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या. त्यातील सर्वांत जास्त खटकणारी बाब म्हणजे रावण म्हणून दाखवलेल्या सैफचा लूक.