‘तारक मेहता..’च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘ही’ लोकप्रिय भूमिका परत येणार?
'तारक मेहता..'च्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार? नवरात्रीत मालिकेत होणार धमाका!
मुंबई- गेल्या 14 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, टप्पू, बबिता यांसारख्या भूमिका घरघरात पोहोचल्या. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना ही मालिका आवडते. अशातच प्रेक्षकांसाठी निर्मात्यांकडून नवरात्रीची (Navratri) खास भेट मिळणार असल्याचं कळतंय. या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय भूमिका लवकरच परतणार असल्याचं समजतंय.