महाराष्ट्र गॉट टॅलेंट! शाळेच्या युनिफॉर्मध्ये चंद्रा गाणं गाणारा युनिक बॉय काय म्हणतोय ऐका…

in #yavatmal2 years ago


चंद्रमुखी सिनेमातलं चंद्रा गाण गाऊन झालेला व्हायरल मुलगा कोण आहे? तो कुठे राहते? तो कुठे गाणं शिकला? त्याला पुढे काय करायचंय? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न टीव्ही 9 मराठीच्या टीमने केलाय.
अहमदनगर : अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी (Chandramukhi) सिनेमातलं ‘चंद्रा’ गाणं (Chandra Song Viral) गाणारा सहावीतला विद्यार्थी तुम्ही पाहिला असेलच. शाळेच्या वर्गात इतर मुलांच्या हजेरीत युनिफॉर्ममध्ये गाणारा हा मुलगा युनिकच होता. इन्टाग्राम, फेसबुकवर (Facebook) आपल्या व्हिडीओची त्याने अनेकांना दखल घ्यायला भाग पाडलं. बघता बघता तो व्हायरल झाला. या मुलाला टीव्ही 9 मराठीनं शोधून काढलंय. या मुलाशी, त्याच्या आईवडिलांशी टीव्ही 9 मराठीच्या टीमने एक्स्क्लुझिव्ह बातचीत केलीय. इतकंच काय तर खास चंद्रा गाणंदेखील या चिमुरड्यानं सादर केलंय.