महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा शेतात मशागत करतात, पाहा एकनाथ शिंदेंचं अनोखं रुप

in #yavatmal2 years ago


मुख्यमंत्री एकनाथ शेती आज त्यांच्या स्वत:च्या साताऱ्यातील दरे गावात दाखल झाले आहेत. यावेळी एकनाथ
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात गेल्या साडेतीन महिन्यांपूर्वी सत्तापालट झालं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे कामात प्रचंड व्यस्त असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदेंनी संपूर्ण राज्य विविध कामांनिमित्त पिंजून काढलं. या दरम्यानच्या काळात ते दिल्ली देखील जावून आले. गणपती, दहीहंडी आणि नवरात्रौत्सवात जिथे बघावं तिथे शिंदे कार्यक्रमात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेणं असेल किंवा राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप योजना सुरु करुन देणं असेल , प्रत्येक ठिकाणी शिंदे झोकून देवून काम करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या या सर्व बिझी शेड्यूलमधून वेळ काढत स्वत:च्या शेतीची मशागत करण्यासाठी वेळ काढला. तिथे त्यांनी आपल्या गुरांना चारा घातला. पिकांना पाणी दिलं. शेतीची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत देखील दिली.