नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवेचं उद्घाटन! ‘या’ शहरांमध्येच वापरता येणार 5G

in #yavatmal2 years ago


आज 5जी सेवेचं मोदींच्या हस्ते लोकार्पण, सर्वसामान्यांना केव्हापासून मिळणार 5जी सेवेचा लाभ? किती रुपये असणार किंमत? जाणून घ्या
टेलिकॉम क्षेत्रासाठी (Telecom industry in India) आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. आजपासून देशात 5जी मोबाईल (5G Service in India) सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता 5जी सेवेचं उद्घाटन होईल. पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील एकूण 13 शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात 5G सेवा सुरु केली जाईल.