बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींची वादग्रस्त अफेअर्स; जाणून घ्या सविस्तर

in #yavatmal2 years ago


पुन्हा एकदा बॉलिवूडमधील अभिनेत्रींची वादग्रस्त अफेरर्स चर्चेत आली आहेत. डॉन दाऊदपासून अबू सालेमपर्यंत अनेक गुन्हगारांवर अभिनेत्रींचा जीव जडला होता.
बॉलिवूडमधील अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)ठग सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग (money laundering)व खंडणी प्रकरणात नुकतीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जॅकलिनची चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणात तिला समन्स बजावण्यात आले आहे. यासगळ्या तपासामध्ये अशीही माहिती समोर आली की, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ठग सुकेश चंद्रशेखरच्या (Thug Sukesh Chandrasekhar) प्रेमात पडली होती. तसेच तिला त्याच्यासोबत लग्नही करायचे होते. सुकेशसोबतच्या लग्नाची स्वप्नही जॅकलिन रंगवू लागली होती. मात्र सुकेश चंद्रशेखर पोलिसांच्या हाती लागला आणि सगळंच फिसकटलं. मात्र यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील अभिनेत्रींची वादग्रस्त अफेरर्स चर्चेत आली आहेत. डॉन दाऊदपासून अबू सालेमपर्यंत अनेक गुन्हगारांवर अभिनेत्रींचा जीव जडला होता.