स्कूटीला वाचवायला गेला, रिक्षावरच उलटला! भरधाव कंटेनरमुळे रिक्षाचा चेंदामेंदा
कंटेनर थेट रिक्षावर पडला, रिक्षामध्ये चालक होता. त्याच्यावर जबर प्रहार होऊन तो कंटेनर खालीच दबला गेला.
पुणे : राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) सुरुच आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडला. हडपसर (Hadapsar Accident News) भागात पहाटेच्या सुमारास अपघाताची दुर्दैवी घटना घडली. भरधाव कंटेनर रिक्षा चालकावर काळ बनून आला. एका स्कूटीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं. भरधाव कंटेनर थेट रिक्षावरच उलटला. यावेळी रिक्षामध्ये असलेला चालक कंटेनरखाली दबला गेला आणि त्याचा जागीच जीव गेला.