जमलंय जमलंय! स्टार किड्सला सुद्धा जमणार नाही, कुत्र्याचा “तोड” अभिनय!

in #nagpur2 years ago


लोकांचा सगळ्यात आवडता प्राणी कुठला असेल तर तो कुत्रा आहे. प्रत्येकाला कुत्रा पाळायचा असतो. त्याची तशी कारणं सुद्धा आहेत. कुत्रा गोंडस, आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतो.
कुत्र्याला कधी अभिनय करताना पाहिलंय का? तुमचा विश्वास बसत नसेल ना? प्राणी सुद्धा माणसांप्रमाणेच अभिनय करू शकतात. तेही आपल्यासारखेच प्रेमळ असतात, आपल्यासारखेच तेही चिडतात, तेही रुसतात आणि आपल्यासारखीच त्यांनाही भूक लागते. लहान मुलं कशी काही हवं असलं की हट्ट करतात किंवा नाटक करतात तसंच काहीसं या कुत्र्याने केलाय. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. यात कुत्र्याने त्याला खायला मिळावं म्हणून जे काय नाटक केलंय ते खूपच हटके आहे.