ज्यांना मोठं समजत होतो, जवळून पाहिल्यावर ते खूपच खुजे निघाले,
भाजपचे अध्यक्षपदी असताना तेव्हा दिल्लीत रहावं लागलं होतं. यावेळी उपहासात्मक शैलीत गडकरी म्हणाले, दिल्लीचं पाणी चांगलं नाहीये.
मुंबईः आतापर्यंत ज्यांना मी मोठं समजत होतो, त्यांना जवळून पाहिल्यानंतर खूप लहान वाटले, असं वक्तव्य केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात (Politics) सक्रिय झालेल्या नितीन गडकरी यांनी दिल्लीतील (Delhi) नेत्यांसंदर्भात हे वक्तव्य केलंय का, यावरून चर्चा सुरु झाली आहे.