घरात समृद्धी पाहिजे आहे? मग वास्तुशास्त्राच्या या नियमाचे अवश्य करा पालन

in #yavatmal2 years ago


हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व आहे. आज आपण काही महत्त्वाचे वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.
मुंबई, आपल्या घरातील देवघरानंतर स्वयंपाकघर (Kitchen) हे दुसरे पवित्र स्थान मानले जाते. आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवतो, म्हणून आरोग्याच्या दृष्टीने स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो. अनेक संसर्गजन्य रोग अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतात, म्हणून स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. वास्तुशास्त्रात (Vastushastra) असे मानले जाते की, स्वयंपाकघरातील वास्तूमुळे कुटुंबाचे आरोग्य आणि नातेसंबंध प्रभावित होतात. वास्तूनुसार स्वयंपाकघर बनवताना काही नियमांचे पालन केल्यास अनेक समस्या कमी होऊ शकतात. वास्तुशास्त्रातील स्वयंपाकघरातील काही महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया.