थिएटरमध्ये व्हिडीओ शूट करणाऱ्यांनी ‘ही’ बातमी वाचाच; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय

in #yavatmal2 years ago


'पोन्नियिन सेल्वन 1'चे निर्माते पोहोचले मद्रास हायकोर्टात
मुंबई- मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा बहुप्रतिक्षित ‘पोन्नियिन सेल्वन- 1’ (Ponniyin Selvan 1) हा चित्रपट आज (30 सप्टेंबर) प्रदर्शित झाला. तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. 1955 मध्ये कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या उपन्यासावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. भारतातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी ही एक आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अशातच कलेक्शनवर फटका बसू नये म्हणून निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली. पायरेटेड व्हर्जनविरोधात त्यांनी मद्रास कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आता कोर्टाने PS-1 या चित्रपटाच्या पायरेटेड व्हर्जनच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.