एक रुपयात चहा आणि 10 रुपयात जेवण, तृतीय पंथीय समाजाचा अनोखा उपक्रम
तृतीयपंथीयांकडून मुंबईमध्ये एक स्तुत्य उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. गरजूंना एका रुपयात चहा आणि 10 रुपयात जेवण देण्यात येत आहे.
मुंबई, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) तृतीयपंथी (Transgender) समाजाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. येथे लोकांना एक रुपयात नाश्ता आणि दहा रुपयात जेवण (Food service) दिले जात आहे. ही अनोखी सुरुवात तृतीयपंथी समाजाच्या 5 हजार लोकांनी मिळून केली आहे. मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गरिबांना जेवण दिले जात आहे.