Navratri Festival 2022 : तुम्हाला मुलगी आहे का? मग हे वाचाच

in #yavatmal2 years ago


कन्येच्या अर्थात मुलीच्या उज्ज्वल उद्याचा विचार करीत, सकाळने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कन्येच्या संपूर्ण विकासाचा प्लॅन नवरात्रोत्सवाच्या काळात देण्याचे नियोजन केले आहे. सकाळ वाचणे एवढीच एक आपुलकीची अट यासाठी ठेवली आहे.नवरात्र हा देवीच्या सन्मानाचा सण. भारतीय परंपरेत या सणाला अत्यंत महत्त्व आहे. परंपरेनुसार आपण स्त्रियांना देवीसम मानतो. नवरात्रात कन्यापूजनही करतो. परंतु एरवी वर्षभर आपण काय करतो? खरेच आपण कन्येचा सन्मान करतो का? मागील चार वर्षांत घसरलेला कन्या जन्मदर आणि लोकसंख्येतील व्यस्त प्रमाण काय सिद्ध करते? नवरात्रातील नऊ दिवस देवीचे पूजन करायचे आणि उर्वरित वर्षभर देवीसमान कन्येकडे दुर्लक्ष करायचे? भारतीय परंपरेने जे महान स्थान कन्येला बहाल केलेले आहे, ते पुन्हा तिला प्राप्त करून देण्यासाठी एक पाऊल आता पुढे यायचे आहे.