पुणे पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण, आता बैठकांचे सत्र

in #yavatmal2 years ago

image.png
पुणे पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांची फौज आणि कार्यकर्त्यांबरोबरच भाजपचे 99 नगरसेवकही कामाला लागणार आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा गड जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय. भाजपलाही (BJP) हिंदू महासभेमुळे समविचारी बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. कारण कसब्यातून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे.