Monsoon session : पुरवणी मागण्या २५ हजार कोटींच्या; निधी वाटपात भाजपचा वरचष्मा

in #yavatmal2 years ago

Thursday, August 18, 2022
AMP

ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Monsoon session : पुरवणी मागण्या २५ हजार कोटींच्या; निधी वाटपात भाजपचा वरचष्मा
Published on : 17 August 2022, 7:15 pm

By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पावसाळी अधिवेशनच्या आज पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. यामधे कर्जाची नियमित प्रतिपुर्ती करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० हजार रूपये अनुदानासाठी ४ हजार ७०० कोटी, तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांत पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर चर्चा केल्यानंतर त्या मंजूर करण्यात येतील. मागील अर्थसंकल्पात संभाव्य आपत्तीचा विचार करून सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांच्या रकमेची मागणी केली नाही. गृहविभागासाठी १,५९३ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित असून सहकार खात्यासाठी ५,१४५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.
esakal_new__18_.jpg