Har Ghar Tiranga : मोदीजी...! घर नाही तिरंगा कुठे लावू....? पुण्यातील विद्यार्थिनींचा पंतप्रधानांना ई-मेल

in #yavatmal2 years ago

मोदींना पत्र लिहिलेली दिव्या.अ.जोशी (वय १९) कमवा शिका अंतर्गत औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात बी.ए मध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत काम करीत आहे. दिव्याची मोठी बहीण चेतना जोशी एका खासगी शाळेत कामाला जाते. त्यातही अर्धा पगार कंत्राटी असल्याने कामावर लावलेल्या संस्थेला जातो व उर्वरित अर्धा पगार तिच्या बहिणीच्या हातात मिळतो. शिवाय, आई आरती जोशी गृहिणी आहे. भाऊ ओमकार जोशी नुकताच दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे, उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. जेमतेम मिळणाऱ्या पैशातही घर खर्च भागविणे तिला अवघड झाले आहे.आपण मला घर घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करून हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी करावे. आम्हाला जगण्यासाठी कोणताच आधार नाही. महागाईने प्रचंड मेटाकुटीला आलो आहोत. भारताचा स्वातंत्र्य दिन मलाही आनंदाने साजरा करावयाचा आहे. केवळ पंतप्रधानाच्या मदतीची अपेक्षा आहे. ध्वज मी खरेदी करेल. परंतु, घर खरेदी करु शकत नाही. मलाही हक्काच्या घरात राहायचं आहे. वडील गेल्यानंतर आईला काम होत नाही. त्यामुळे, मी मोदींना इ मेल केला आहे. आता पीएम कार्यालयाला पत्र पाठवणार आहे. अपेक्षा आहे की, त्यांची मदत मिळेल.- दिव्या जोशी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नवी सांगवीHome.jpg